आयसिसमध्ये सामील होणाऱ्या तरुणाला लिबियातून अटक

 Pali Hill
आयसिसमध्ये सामील होणाऱ्या तरुणाला लिबियातून अटक

मुंबई - आयसिसमध्ये सामिल होणाऱ्या मुंब्रात राहणाऱ्या तबरेज नूर मोहम्मद तांबेला एटीएसनं पकडलंय. महाराष्ट्र एटीएसनं लिबियन गुप्तचर यंत्रणांच्या मार्फत त्याला लिबियातच गाठून अटक केलीय. मुंब्र्याचा तबरेज हा आयसिसमध्ये दाखल होण्याच्या वृत्तानं चांगलीच खळबळ उडाली होती. राज्य एटीएसनं त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला होता.

तबरेज हा आयसिसमध्ये सामिल होणार असल्याची माहिती त्याचा भाऊ सौदने एटीएसला दिली होती. त्यानंतर एटीएसनं मुखबराहत-अल-जमाहिरिया या लिबियन गुप्तचर यंत्रणेशी संपर्क साधला होता. भारतीय तपास यंत्रणांनी तबरेज तांबेचा फोटो दिल्यानंतर तात्काळ देशातील विमानतळ, बस स्थानकं तसंच लिबियन सुरक्षा दलांना सतर्क करण्याचं काम गुप्तचर यंत्रणेनं केलं होतं. अशातच तबरेज हा लिबियाची राजधानी ट्रिपोलीत असल्याची माहिती मिळाली आणि त्याला ताब्यात घेण्यात आलं.

Loading Comments