जयजीत सिंह ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त, विनीत अग्रवाल एटीएस प्रमुख

ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना अप्पर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती मिळाल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तांची जागा रिकामी होती.

जयजीत सिंह ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त, विनीत अग्रवाल एटीएस प्रमुख
SHARES

राज्याच्या पोलीस दलात सोमवारी मोठे बदल करण्यात आले. राज्य दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख जयजीत सिंह (Jaijeet Singh ) यांची ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी (cp of thane) बदली करण्यात आली आहे. तर अपर पोलिस महासंचालक विनीत अग्रवाल ( Vineet Agarwal ) एटीएस (ATS) चे प्रमुख बनले आहेत. विनीत अग्रवाल हे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) म्हणून कार्यरत होते. 

विशेष अभियानाचे अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांची गृह विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय पोलीस सेवेतील अपर पोलीस महासंचालक श्रेणीतील अधिकारी यांच्या  बदल्यांचा राज्य सरकारकडून आदेश जारी करण्यात आला आहे.

ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना अप्पर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती मिळाल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तांची जागा रिकामी होती. ४ मे रोजी त्यांची नियुक्ती पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली. मात्र, फणसळकर यांच्या बदलीनंतर नवीन आयुक्तांची नियुक्ती रखडली होती. त्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त कोण होणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं होतं. अखेर सोमवारी जयजीत सिंग यांच्याकडे ठाणे पोलिस आयुक्तपदाची सूत्रे सोपवण्यात आली.  

जयजीत सिंह यांच्याकडे गेल्यावर्षी आॅक्टोंबर मध्ये एटीएस प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते १९९० च्या बॅचचे अधिकारी आहेत. याआधी त्यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदाचीही धुरा सांभाळली आहे. तसेच मुंबई रेल्वे पोलीस अतिरिक्त महासंचालक म्हणून काम पाहिले आहे. अँटलिया येथील स्फोटके प्रकरणाचा तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.



हेही वाचा - 

आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती

COVID 19 रुग्ण शोधण्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं, अभ्यासातून उघड

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा