रेल्वे स्टेशनवर महिलेची हत्या करण्याचा प्रयत्न

हार्बर रेल्वेवरील स्टेशनवर महिलेचा गळा चिरण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे.

रेल्वे स्टेशनवर महिलेची हत्या करण्याचा प्रयत्न
SHARES

हार्बर रेल्वेवरील डॉकयार्ड रोड स्टेशनवर महिलेचा गळा चिरण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. सुदैवानं मध्य रेल्वेच्या सिनिअर तिकीट बुकिंग ऑफिसरला वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे त्यानं महिलेचे प्राण वाचवले. हा सगळा प्रकार स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

डॉकयार्ड रोड स्टेशनवर महिलेवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. महिलेच्या ओळखीच्या व्यक्तीनेच हा हल्ला केल्याचा संशय आहे. जखमी महिलेवर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सीसीटीव्हीत संबंधित महिलेनं बुरखा घातला आहे. तर तिच्या मांडीवर लहान मुलगी बसल्याचं दिसतं. सुरुवातीला आरोपी तिच्या खांद्यावर हात टाकून शेजारीच बसला होता. त्यामुळे तो तिच्या ओळखीतील असल्याचं वाटतं. नंतर आरोपी समोर उभा राहिला, त्यानं हळूच खिशातून चाकूसदृश्य धारदार शस्त्र बाहेर काढलं. महिलेचं लक्ष नसताना तिचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला.

हल्ला केल्यानंतर आरोपी मागच्या दिशेनं पळून गेला. महिला आधी उठून उभी राहिली आणि त्याच्याकडे बघत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागली. तर तिच्या मांडीवरची लहान मुलगीही खाली उभी राहिली. मात्र आरोपी पायऱ्यांवरुन धावत खाली जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसतो.

सुदैवानं मध्य रेल्वेचे वरिष्ठ तिकीट बूकिंग ऑफिसर वेल मुरुगन गोपाळ कोनार यांना हा प्रकार वेळीच लक्षात आला. ती महिला कोण आहे, आरोपी कोण आहे, दोघांचा एकमेकांशी काय संबंध, याविषयी अद्याप माहिती नाही. तिच्या हत्येचा प्रयत्न करण्याचं नेमके कारण काय, हेही अद्याप अस्पष्ट आहे.



हेही वाचा

मालकाकडून नोकराची हत्या, दोघांना अटक

उत्तराखंडमध्ये फिरायला गेलेल्या मुंबईतल्या दांम्पत्याचा मृत्यू

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा