Advertisement

उत्तराखंडमध्ये फिरायला गेलेल्या मुंबईतल्या दांम्पत्याचा मृत्यू

त्यांचे मृतदेह तब्बल पंधरा दिवसांनी स्थानिक पोलिसांना सापडले आहेत.

उत्तराखंडमध्ये फिरायला गेलेल्या मुंबईतल्या दांम्पत्याचा मृत्यू
SHARES

उत्तराखंड इथं बर्फाळ भागात फिरायला गेलेल्या मुंबईतल्या एक दांपत्याचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. प्रचंड थंडी आणि बर्फात अडकून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांचे मृतदेह तब्बल पंधरा दिवसांनी स्थानिक पोलिसांना सापडले आहेत.

मुंबईचे रहिवासी असलेले संजीव गुप्ता आणि आणि त्यांची पत्नी सिंशा गुप्ता हे १३ डिसेंबरला उत्तरखंड इथल्या जोशीमठ परिसरात असलेल्या गौरसो टॉप परिसरात फिरायला गेले होते. मात्र तिथं प्रचंड बर्फ वृष्टी झाली होती. कदाचित यामुळे हे दांपत्य या बर्फात अडकून पडले आणि त्यातच कडाक्याच्या थंडीनं त्यांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

संजीव हे अनेक वर्षे एका वृत्तवाहिनीमध्ये कॅमेरामन म्हणून कार्यरत होते. ते प्रभादेवी इथल्या भारत मिल म्हाडा वसाहतमध्ये भाड्यानं रहात होते. ही घटना घडल्यानंतर स्थानिक पोलिस आणि प्रशासनाला त्यांच्या कुटुंब मित्र परिवार यांचा शोध लागत नव्हता.

अखेर गुप्ता ज्या असोसिएशनचे सदस्य होते त्या असोसिएशन मधून त्यांचा संपर्क झाला. अखेर सतरा ते अठरा दिवसांनी त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.हेही वाचा

पुढचे ३-४ दिवस मध्य रेल्वेची लोकल उशिरा धावणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा