मालकाकडून नोकराची हत्या, दोघांना अटक

आरोपी पळून जात असतामा त्यांना चेंबूरमधून अटक करण्यात आली.

मालकाकडून नोकराची हत्या, दोघांना अटक
SHARES

आपल्या १२ वर्षीय मुलीची झोपत छेड काढली या रागातून आई वडिलांनी ६९ वर्षीय नोकराला बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अब्दुल खलील शेख असं या नोकराचं नाव आहे.

अब्दुल हा आरोपी मोहम्मद सलीम जफर मोहम्मद अखतर आलम ऊर्फ सलीम आणि फरीदा यांच्या मुलुंड इथल्या घरी घरकाम करीत होते. १ तारखेला अब्दुल यांनी त्यांच्या मुलीला झोपतून उठवताना अंगाला हात लावत छेड छाड केली असा आरोपी पालकांचं म्हणणं आहे.

याच रागातून दोन दिवस सलीम आणि त्याची पत्नी अब्दुल यांना लाकडी दांडे, पट्टे यांनी मारहाण करीत होते. त्यानंतर त्यांनी रविवारी अर्धमेल्या अवस्थेत त्यांना शिवाजी नगर इथल्या त्यांच्या जावयाच्या हवाली करण्यास आणलं. मात्र रस्त्यातच अब्दुल यांचा मृत्यू झाला. या नंतर या पतीपत्नीनी रस्त्यावरच अब्दुल यांचा मृतदेह फेकून पळ काढला.

मृतदेहाबाबत मानखुर्द पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठवला. या वेळी त्यांना मारहाण होऊन अंतर्गत हाडे तुटून रक्तस्त्राव झाल्याचं समोर आलं. पोलिसांनी यानंतर हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी पळून जात असतामा त्यांना चेंबूरमधून अटक करण्यात आली.हेही वाचा

मुंबईतील SBI बँकेत दरोडा घालणाऱ्या दोघांना अटक

१८ केनियन महिला सोने तस्करी प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा