रिक्षात बसल्याच्या रागातून मुलाला मारहाण

 Mumbai
रिक्षात बसल्याच्या रागातून मुलाला मारहाण

विरार - रिक्षात बसल्याच्या रागातून एका रिक्षा चालकाने सात वर्षीय मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना 17 मार्चला घडली. या मारहाणीत सात वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जाधव असं या रिक्षाचालकाचे नाव असून, पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

विरार पश्चिमेतील यशवंत स्नेह को.ऑप हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारा हेमंग यांचा सात वर्षीय मुलगा जाधव याच्या रिक्षात बसला. रिक्षात बसू नको असे सांगूनही तो रिक्षात बसल्याने जाधव याचा राग अनावर झाला आणि त्याने त्याला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केल्याचा आरोप पीडित मुलाच्या आई-वडिलांनी केला आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Loading Comments