दोन बायका फजिती एेका

  Malad
   दोन बायका फजिती एेका
  मुंबई  -  

  मालाड - एका बायकोची मर्जी सांभाळताना अनेक नवरदेवांची दमछाक होते. मग दोन बायका असतील तर काय होईल याची कल्पनाच केलेली बरी. अशाच दोन बायकांचा दादला असलेल्या एका नवरोबाने बायकांना खूश ठेवण्यासाठी चोरी करण्यास सुरुवात केली. बघता बघता त्याने 25 चोऱ्या केल्या, पण अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडला.

  सर्फुद्दीन असे या चोराचे नाव आहे. पोलिसांनी 6 ऑक्टोबरला त्याल अटक केली. पोलिस चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला. पेशाने रिक्षाचालक असलेल्या सर्फुद्दीन शेख याने त्याने दोन लग्ने केली होती. पण रिक्षा चालवून होणाऱ्या कमाईतून दोन्ही बायकांचा खर्च करणे त्याला परवडत नव्हते. त्यामुळे त्याने चोरी करण्याचा मार्ग निवडला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.