चेंबूर - महापालिकेच्या एम पश्चिम वॉर्ड कार्यालयासमोर एका रिक्षाला पालिकेच्या मालवाहक गाडीनं धडक दिली. सकाळी 6:30 वाजता ही घटना घडली. महापालिकेची मालवाहक गाडी (नंबर-MH-03,N7008 ) भरधाव वेगात जात होती. पुढे जाणाऱ्या रिक्षासमोर अचानक कुत्रा आल्याने चालकानं ब्रेक दाबला आणि पाठीमागून येणाऱ्या महापालिकेच्या गाडीनं रिक्षाला जबर धडक दिली. या अपघातामध्ये भारतनगर येथे राहाणाऱ्या राजेन्द्र गुप्ता या रिक्षाचालकाच्या डोक्याला जबर झाली असून त्याला आधी शताब्दी आणि नंतर शीव येथील टिळक रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.