नोकरानंच फोडलं लॉकर


SHARE

वांद्रे - पाली हिल परिसरात राहणाऱ्या भावना शाह यांच्या घरात नोकरानंच चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आलंय. विजय कुमार राम संजिवन असं या 21 वर्षीय चोरट्याचं नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात. 7 नोव्हेंबरला पाली हिल परिसरात राहणाऱ्या भावना शाह यांच्या घरातले 46 लाखांचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणी शाह यांनी 13 नोव्हेंबरला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. विजय कुमार राम संजीवन 15 नोव्हेंबरपासून पळून केल्याची माहिती तपास अधिकारी धनंजय साठे यांना मिळताच त्यांनी शोध सुरू केला होता. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या