भाजपा कार्यकर्त्यांची गुंडगिरी

दहिसर - येथील राज पॅलेस बारमध्ये सोमवारी भाजप कार्यकर्ते आणि बार कर्मचारी यांच्यात हाणामारी झाली. हाणामारीत दोन्ही गटांतील 4 जण जखमी झाले आहेत. दारूचं बिल न चुकवल्यावरुन हाणामारी झाल्याचं या कर्मचाऱ्यांनी सांगितलंय. या सर्व प्रकाराबाबत दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. तक्रारीदरम्यान हाणामारीत भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी असल्याचं समोर आलंय. कार्यकर्ते दारू पिण्यासाठी बारमध्ये येत होते, पण बिल न चुकवता जात असत. जुनं बिल मागितलं म्हणून कार्यकर्त्यांनी हाणामारी केली असं बार कर्मचाऱ्यांनी सांगितलं. तक्रारीनंतर मीरा भाईंदर भाजपा युवा अध्यक्ष सूरज शेट्टी आणि युवा मोर्चा सचिव धीरज सिंह यांच्यासह विक्की कपूर, अरमान यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आलीय. ईश्वर पुजारी आणि प्रसाद कृष्णा शेट्टी या दोन हॉटेल कर्मचारी यांना अटक करण्यात आलीय.

Loading Comments