बीआरसीतल्या वैज्ञानिकाची आत्महत्या


बीआरसीतल्या वैज्ञानिकाची आत्महत्या
SHARES

मुंबईच्या चेंबूर परिसरात असलेल्या प्रसिद्ध भाभा अणुसंशोधन केंद्रात कार्यरत असलेल्या एका तरुण वैज्ञानिकाने निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनुज त्रिपाटी (३८) असे या वैज्ञानिकाचे नाव असून कौटुंबिक वादातून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी ट्राँम्बे पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंदवण्यात आला आहे.

अणुशक्तीनगरमधील आकाशगंगा इमारतीमध्ये अनुज हे पत्नी आणि मुलांसह वास्तव्यास होता. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अनुज यांनी बेडरूममध्ये जाऊन टॉवेलच्या साहाय्याने पंख्याला गळफास लावून घेतला. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने पत्नीने पाहिले त्यावेळेस अनुज हे गळफास लावलेल्या स्थितीत आढळले. त्यांना तत्काळ बीएआरसी येथील रुग्णालयात नेण्यात आले मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबतची माहीती मिळताच ट्राँम्बे पोलिस घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक चौकशीत अनुज यांचे सकाळी ९ वाजताच्या सुमारास पत्नीसोबत भांडण झाले होते. मुलांना खायला देण्यावरून वाद झाल्यानंतर अनुज बेडरूम गेले आणि त्यांनी गळफास लावून घेतला. याप्रकरणी ट्राँम्बे पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा