देवनारमध्ये बकऱ्यांची चोरी रोखण्यासाठी बारकोड पास

चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी आता डिजिटल बारकोड असलेले पास बनवले आहेत. बारकोड असणारे हे गेट पास स्कॅन करुन व त्यानुसार खात्री झाल्यानंतरच जनावरांना बाहेर घेऊन जाता येणार आहे.

देवनारमध्ये बकऱ्यांची चोरी रोखण्यासाठी बारकोड पास
SHARES

'बकरी ईद' सणाच्या निमित्ताने मुंबईतील देवनारच्या पशुवधगृहात वेगवेगळ्या राज्यांमधून व्यापारी बकरे विक्रीसाठी आणतात. मंडीमध्ये लाखोंच्या संख्येने आलेल्या बकऱ्यांच्या पळवा पळवीच्या अनेक घटना मागील वर्षी घडल्या आहेत. हे चोरीचे प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता प्रत्येक व्यापाऱ्याला आता डिजिटल पास दिले आहेत. त्यामुळे बकरे चोरीच्या प्रमाणावर लगाम लावण्यात पोलिसांना यश आलं आहे.


नोंद ठेवणं सुलभ

मुंबईच्या देवनारमधील पशुवधगृहात देशातून लाखो बकऱ्या या बकरी ईदच्या निमित्ताने विक्रीसाठी आणले जातात. या व्यापाऱ्यांना पोलिस पूर्वी कागदी पास देत होते. मात्र या पासचे चोरटे बनावट पास तयार करून ते बकऱ्यांची चोरी करायचे. या आधीही बकऱ्या चोरी प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी आता डिजिटल बारकोड असलेले पास बनवले आहेत. बारकोड असणारे हे गेट पास स्कॅन करुन व त्यानुसार खात्री झाल्यानंतरच जनावरांना बाहेर घेऊन जाता येणार आहे. या पासमध्ये चोरांनी फेरफार करून किंवा पास चोरी करून बकऱ्या चोरण्याचा प्रयत्न केल्यास तात्काळ आऊट गेटवर ते पकडले जाऊ शकतात. या नवीन बारकोड पासमुळे जनावरांच्या चोरीला आळा बसण्यासोबतच जनावरांची आवक व जावक नोंद ठेवणं सुलभ होणार आहे.


दोघांना पकडलं

५ आॅगस्ट २०१९ रोजी दोन चोरांनी देवनारमधून बकऱ्या चोरीचा प्रयत्न केला. गेटवर त्या दोघांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले. या दोघांवर पोलिसांनी ३७९,३४ भा.द.वि कलमांतर्गत गुन्हे नोंदवून त्यांना अटक केल्याची माहिती देवनार पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक रागिणी भागवत यांनी दिली.



हेही वाचा -

रिझवानच्या अटकेने दाऊद संतापला, शकील आणि फईमला फैलावर घेतलं

हाॅर्न वाजवल्यावरून वाद होऊन घाटकोपरमध्ये हत्या



 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा