रिझवानच्या अटकेने दाऊद संतापला, शकील आणि फईमला फैलावर घेतलं

इक्बाल पाठोपाठ रिझवानला अटक झाल्याने दाऊद आता चांंगलाच संतापल्याचे सांगितलं जातं. रिझवानच्या अटकेचा राग त्याने दुबईत असलेल्या शकील आणि फईमवर फोनवरून काढल्याचे कळतं.

रिझवानच्या अटकेने दाऊद संतापला, शकील आणि फईमला फैलावर घेतलं
SHARES

इक्बाल कासकरचा मुलगा रिझवान कासकरला खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी केलेली अटक ही अंडरवर्ल्ड डॉन  दाऊदच्या जिव्हारी लागली आहे. रिझवानच्या अटकेनंतर दाऊदने शकील आणि फईमला चांगलंच फैलावर धरल्याचं कळतं. एकामागोमाग एक कुटुंबातील सदस्य पोलिस आणि तपास यंत्रणांच्या निशाण्यावर असल्याने दाऊदची डोकेदुखी वाढली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केलेला आरोपी अश्पाक रफिक टोपीवाला (३४) याने एका व्यावसायिकासोबत ३ वर्षांपूर्वी चीनमधून इलेक्ट्राॅनिक वस्तू खरेदी करून त्या दुबई आणि भारतात विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता. व्यावसायिक पैसे पुरवायचा तर अश्पाक चीनमधून वस्तू खरेदी करायचा. सर्व काही सुरळीत सुरू असताना नोटबंदीची घोषणा झाली. त्यात अश्पाक कर्जबाजारी झाला. मात्र विकलेल्या मालाचे १५ लाख ५० हजार रुपये तो व्यावसायिकाला देणं बाकी होता. व्यावसायिकाने अश्पाककडे या पैशांसाठी तगादा लावला होता. या व्यवहारात आरोपी अहमद राजा अफ्रोज वधारिया (२४) याचाही सहभाग होता. तो गुजरातच्या सूरत इथून कारभार संभाळायचा. व्यावसायिकापासून पिच्छा सोडवण्यासाठी त्याने रिझवानकडे मदत मागितली. २०१६ मध्ये रिझवाननेच दुबईत फईम आणि छोटा शकीलची अहमद याच्याशी ओळख करून दिली होती. त्यानुसार रिझवानने काही पैशांसाठी या प्रकरणात कुख्यात गुंड छोटा शकील आणि त्याचा हस्तक फईम मचमच याला खेचलं.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर दाऊदनंतर त्याच्या कुटुंबातील दुसरी पिढी आता अंडरवर्ल्डमध्ये सक्रीय होत असल्याचे बोलले जात असले तरी सर्वच जण अंडरवर्ल्डमध्ये सक्रीय नसून काही मुलांनी स्वतःचा वेगळा व्यवसाय सुरू केला. तर काही मुले अद्याप शिक्षण घेत आहेत. या मुलांपैकी दाऊदचा मृत भाऊ नूराचा मुलगा सोहेल कासकर तपास यंत्रणांच्या मुख्य केंद्रस्थानी होता. काही दिवसांपूर्वी सोहेलला परदेशात शस्त्र तस्करी प्रकरणी अटक केली होती.  त्या पाठोपाठ ठाणे खंडणी विरोधी पथकाने इक्बालला अटक केली. इक्बाल पाठोपाठ रिझवानला अटक झाल्याने दाऊद आता चांंगलाच संतापल्याचे सांगितलं जातं. रिझवानच्या अटकेचा राग त्याने दुबईत असलेल्या शकील आणि फईमवर फोनवरून काढल्याचे कळतं. रिझवानच्या अटकेनंतर संतापलेला दाऊद आणि परिस्थितीचा फायदा दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम घेऊन लागला आहे. दाऊदचा सर्व कारभार सध्या शकील संभाळत आहे. रिझवानच्या अटकेनंतर दाऊद आणि शकीलला बाजूला करून अनिश डी गँगचा कारभार संभाळण्यासाठी खेळी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.



हेही वाचा -

हाॅर्न वाजवल्यावरून वाद होऊन घाटकोपरमध्ये हत्या

'मुन्नाभाई स्टाईल'ने काॅपी करणं पडलं महागात, ११ विद्यार्थ्यांना अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा