'मुन्नाभाई स्टाईल'ने काॅपी करणं पडलं महागात, ११ विद्यार्थ्यांना अटक

एका विद्यार्थ्याच्या हालचालीकडे पर्यवेक्षक केतन चव्हाण यांचे लक्ष गेले. त्याच्या संशयित हालचालीमुळे केतन यांनी त्याची झडती घेतली असता. त्याच्याकडे मायक्रोफोन आढळून आला.

SHARE

देशातील महत्त्वाच्या परीक्षेपैकी एक असलेल्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेत खळबळ उडवणारी घटना घडली आहे. या परीक्षेत ‘मुन्नाभाई स्टाईल’ कॉपी करणाऱ्या ११ विद्यार्थ्यांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. ब्ल्यूटूथ आणि काॅलर डिव्हाइसच्या मदतीने कानात मायक्रोफोन अडकवून हे ११ विद्यार्थी काॅपी करताना आढळून आले आहेत.


मायक्रोफोन आढळला

पवईच्या आॅरम आय.टी. पार्क, आॅनलाईन एक्झाम सेंटरमध्ये ६ जुलै रोजी स्टाफ सिलेक्शन कमिशनची दुसऱ्या टप्यातील परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या पहिल्या टप्यात १८७० विद्यार्थी उतीर्ण झाले होते. परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रीक साधने परीक्षा हाॅलबाहेर ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. दरम्यान हाॅल क्रमांक २ मध्ये एका विद्यार्थ्याच्या हालचालीकडे पर्यवेक्षक केतन चव्हाण यांचं लक्ष गेलं. त्याच्या संशयित हालचालीमुळे केतन यांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मायक्रोफोन आढळून आला. कानाला लावलेल्या माक्रोफोनच्या मदतीने तो काॅपी करत होता. त्यावेळी मायक्रोफोनला इतरही विद्यार्थी कनेक्ट असल्याचा संशय आल्यानंतर पोलिसांनी हाॅलमध्ये परीक्षा देत असलेल्या २५० मुलांची मेटल डिटेक्टरच्या मदतीने तपासणी केली असता हाॅलमधील ११ मुले काॅपी करत असल्याचं पुढं आलं.


पोलिस कोठडी 

या प्रकरणी पवई पोलिसात तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी सर्व ११ मुलांना अटक केली आहे. प्रदीप ओमप्रकाश, राजू रामनिवास, अमन हरीकेश, दिनेश दलबिर, मोहिम बिजेंदर, कुशकुमार पुलकुमार, नवीन सुभाषचंद्र, सुमीत कुलदिप, राकेश ओमप्रकाश, सौरभ सुभाष, नविन सिंग अशी या त्यांची नावे आहेत. ही मुले मूळची हरियानाच्या जिंद व हिसार जिल्ह्यातील आहेत.  या सर्वांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.हेही वाचा  -

मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्याची हत्या

लोकलवर दगड फेकणाऱ्यांवर आता सीसीटीव्हीचं लक्ष?
संबंधित विषय
ताज्या बातम्या