मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्याची हत्या

त्यावेळी चौकशीत सापाच्या तस्करीत उदयभानने २१ लाखांना गंडवलं होतं याची कबुली प्रदीपने दिली. त्याचाच राग म्हणून प्रदीपने त्याला एका पार्टीला भेटण्यासाठी बोलवले.

SHARE

मुंबईच्या घाटकोपर परिसरात राहणाऱ्या उदयभान पाल (४७) या व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह चिपळूणच्या कुंभार्ली घाटात टाकणाऱ्या पाच जणांना घाटकोपर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.  प्रदीप सुर्वे, विनोद शुद्रीक, सुरेश सोनावणे, अक्षय अवघडे आणि कलीम कुरेशी अशी आरोपींची नावे आहेत. मांडुळच्या तस्करीवरून झालेल्या आर्थिक व्यवहारातून ही हत्या करण्यात आल्याची कबुली सर्व आरोपींनी पोलिसांना दिल्याची माहिती पोलिस उपायुक्त अखिलेशकुमार सिंह यांनी दिली.


२१ लाखांना गंडवलं 

घाटकोपरच्या अशोकनगर परिसरात उदयभान हा पत्नी आणि कुटुंबियांसह रहात होता. १७ जून रोजी उदयभान हा कुटुंबियांना कामानिमित्त सातारा येथे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. मात्र तीन ते चार दिवस तो घरीच परतला नाही. तसंच त्याचा फोनही लागत नव्हता. त्यामुळे उदयभानच्या पत्नी सावित्री यांनी घाटकोपर पोलिस ठाण्यात उदयभानच्या मिसिंगची तक्रार नोंदवली.

या तक्रारीनंतर पोलिसांनी उदयभानच्या मोबाइलच्या सीडीआरनुसार त्याचा माघ काढण्यास सुरूवात केली. चौकशीत उदयभान हा  काळ्याविद्येसाठी वापरल्या जाणाऱ्या मांडुळ या सापांची तस्करी करत असल्याचं पुढं आलं. तसंच तो वारंवार प्रदीप सुर्वे यांच्या संपर्कात असल्याचे पुढे आल्यानंतर पोलिसांनी प्रदीपला कराड येथून ताब्यात घेतले. त्यावेळी चौकशीत सापाच्या तस्करीत उदयभानने २१ लाखांना गंडवलं होतं याची कबुली प्रदीपने दिली. त्याचाच राग म्हणून प्रदीपने त्याला एका पार्टीला भेटण्यासाठी बोलवले. त्यानंतर प्रदीपसह इतर आरोपींनी त्याला गोपाळवाडी कोयनानगर येथे नेऊन त्याची हत्या केली.


दरीत मृतदेह टाकला

हत्येनंतर उदयभानच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास प्रदीपने कलीम कब्बीर कुरेशी याला सांगितलं. त्यानुसार कलीमने कराड-चिपळून दरम्यान असलेल्या कुंभार्ली घाटातील दरीत उदयभानचा मृतदेह टाकून पळ काढला. पोलिसांनी तांत्रिक यंत्रणांच्या मदतीने या टोळीचा पर्दाफाश करून त्यांना अटक केली आहे.हेही वाचा  -

लोकलवर दगड फेकणाऱ्यांवर आता सीसीटीव्हीचं लक्ष?
संबंधित विषय
ताज्या बातम्या