हाॅर्न वाजवल्यावरून वाद होऊन घाटकोपरमध्ये हत्या

संदीपने मारलेला चाकू मनोहर चावरिया यांच्या डाव्या बाजूला बरगडी जवळ लागला. या हल्यात मनोहर हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. उपचारा मनोहर यांचा मृत्यू झाला.

SHARE
गाडीचा हाॅर्न वाजवल्याच्या क्षुल्लक  कारणावरून घाटकोपरच्या विद्याविहार परिसरात एका वृद्धाची हत्या करण्यात आल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली. मनोहर चावरिया असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.


भांडण सोडवण्याचा प्रयत्न

घाटकोपरच्या मोहन नगर बंजारा वस्तीतून दुपारी १२ च्या सुमारास दिपक चावरिया (२९)  त्याचा भाऊ मनोज चावरिया (३२) हे दोघे कामानिमित्त मोटरसायकलवरुन निघाले होते. अरुंद गल्लीतून जाताना रस्त्यामध्ये आरोपी संदिप पारचा (२८) व त्याचे वडील पालसिंग पारचा (७०) हे उभे होते.  त्यावेळी दिपक यांनी मोटरसायकलचा हाॅर्न वाजवला असता संदिपला त्याचा राग आला. त्याने चावरिया बंधुना शिवीगाळ केली. याचा जाब चावरिया बंधुनी विचारला असता संदीप व त्याचे वडील पालसिंग यांनी चावरिया बंधुंना धक्काबुक्की केली. त्यावेळी जवळच असलेले चावरिया बंधुचे वडील मनोहर चावरिया (५७) व बहिण पुजा (३६) हे भांडण सोडवून आरोपींना समजावण्याचा प्रयत्न करत होते.

चाकू हल्ला

शाब्दिक वादातून राग अनावर झालेल्या संदीपने  घरातून चाकू आणुन चावरिया बंधुंना मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मनोहर हे मध्ये आल्याने संदीपने मारलेला चाकू मनोहर चावरिया यांच्या डाव्या बाजूला बरगडी जवळ लागला. या हल्यात मनोहर हे  गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी  घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान मनोहर यांचा मृत्यू झाला.  या हल्यात पालसिंग पारचा व कृष्णा पारचा हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी संदिपला अटक केली आहे.हेही वाचा -

'मुन्नाभाई स्टाईल'ने काॅपी करणं पडलं महागात, ११ विद्यार्थ्यांना अटक
संबंधित विषय
ताज्या बातम्या