गुंतवणूकीत दुपटीने परतावा देण्याचे आमीष दाखवून फसवणूक


गुंतवणूकीत दुपटीने परतावा देण्याचे आमीष दाखवून फसवणूक
SHARES
दुर्मिळ नाण्यांच्या खरेदी विक्री मधून गुंतवणूकदारांना काही महिन्यातच दुपटीने परतावा करतो असे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यास मुंबईच्या खार पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा ब्रिटिश नागरिक असून  इसा अहमद खान असे या आरोपीचे नाव आहे.

इसा हा ब्रिटीश नागरिक असून त्याने मुंबई व बंगळूरु येथे एक कंपनी स्थापन केली होती. त्या कंपनीद्वारे दुर्मिळ नाण्यांच्या खरेदी विक्री व्यवहारात गुंतवणूकदारांना दुप्पटीने पैसे देण्याचे आमीष दाखवले. त्यानुसार सुरुवातीला काही दिवस गुंतवणूकदारांना पैसे देवून त्यांचा विश्‍वास संपादन केला व नंतर गुंतवणूकदारांची फसवणूक केली. याबाबत खार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाा. त्यानुसार पोलीसांनी कंपनीच्या यु.बी.सीटी, बंगळुरू, कर्नाटक येथील कार्यालयात जावून वेगवेगळ्या डिझाईनचे कॉईन बनविण्याचे डाय, कंपनीचे ब्रोशर्स व व्हिजीटिंग कार्डस तसेच वेगवेगळया देशाचे व चित्रांचे ९९७ दुर्मिळ कॉईन हस्तगत केले. तसेच आरोपीताच्या विविध ०६ बँक खात्यामधील रक्‍कम रू. ९,९१९,४७,०९९ रक्कम 
गोठविली.

 तपासात मुख्य आरोपी नामे इसा अहमद खान याचा मुंबईतील हस्तक नामे आमिर याकुब शेख (३०) याने इसा अहमद खान यास मुंबईतील भेंडीबाजार भागातून जुने कॉईन्स विकत घेण्यासाठी मदत केली असून स्वतःची इलीयाना मार्केटेंग कंपनी स्थापन करुन गुंतवणूकदारांकडून सुमारे १ ते २ कोटी रुपये जमा केले
असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आमिर याकुब शेख (३०) याला मुंबई सेंट्रल, येथून अटक करण्यात आली असून त्याला १९ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा