ब्रेक फेल होऊन बेस्टचा अपघात

 Mumbai
ब्रेक फेल होऊन बेस्टचा अपघात
ब्रेक फेल होऊन बेस्टचा अपघात
See all

एलबीएस मार्ग भांडुप - लाल बहादूर शास्त्री मार्गावरून गोरेगाव ते मुलुंड प्रवास करणाऱ्या 496 क्रमांकाच्या बसला शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास अपघात झाला. या बसचा ब्रेक अचानक फेल झाल्यामुळे ही बस ड्रीम्स मॉलसमोरच्या थांब्यावर उभ्या असलेल्या दोन बसना जाऊन धडकली. सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी झालं नाही. घटनास्थळी पोहचलेल्या बेस्टच्या मेकॅनिकनी ही बस दुरुस्ती करून आगारात नेली. या घटनेची नोंद भांडुप पोलिसांनी केली आहे.

Loading Comments