SHARE

माहीम स्थानकात झालेल्या दरोड्याप्रकरणी रेल्वे पलिसांनी पाच आरोपींना अटक केलीय. माहीम स्थानकावरील सीसीटीव्हीच्या मदतीने  पोलिसांनी आरोपींना अटक केली. रमजान शेख,  नामदेव कसबे,  राहुल नायडू,  दाविद कोरणा आणि रमेश मल्लेपांग अशी या आरोपींची नावे आहेत. सोमवारी पहाटे अरविंदकुमार पांडे माहीम फलाट क्रमांक 1 वर झोपलेला होता. त्यावेळी पाच जणांनी त्याचावर हल्ला केला आणि त्यांचाकडची बॅग घेऊन पसार झाले होते. त्यानंतर जखमी अवस्थेत अरविंदकुमारने पोलिस स्टेशन गाठले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सायन रुग्णालयात दाखल केले.

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या