सायबर पोलिसांचे आवाहन, ऑक्सी पल्स मीटर संदर्भातल्या फसव्या संदेशापासून रहा सावधान

कोरोना महामारीच्या काळात असा फसवा व्हाट्सएप संदेश फिरत आहे कि एक विशिष्ट भ्रमणध्वनी एप डाउनलोड केले तर तर ,तुम्ही घरच्या घरी आपले body pulse व रक्तातील oxygen चे प्रमाण मोजू शकता

सायबर पोलिसांचे आवाहन, ऑक्सी पल्स मीटर संदर्भातल्या फसव्या संदेशापासून रहा सावधान
SHARES

ऑक्सी पल्स मीटर संदर्भातील फसव्या व्हाट्सएप संदेशाला बळी पडू नये. सायबर भामट्यांपासून सावध रहावे असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागातर्फे  करण्यात येत आहे. सध्या कोरोना महामारीच्या काळात असा फसवा व्हाट्सएप संदेश फिरत आहे कि एक विशिष्ट भ्रमणध्वनी एप डाउनलोड केले तर ,तुम्ही घरच्या घरी आपले body pulse  व रक्तातील oxygen चे प्रमाण मोजू शकता व त्याकरिता स्वतंत्ररित्या pulse -oxy meter हे उपकरण घ्यायची गरज नाही ' व त्याबरोबर सदर मोबाईल अॅप डाउनलोड करायची लिंक दिली असते . महाराष्ट्र सायबर तर्फे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की ,

१)कृपया अशा संदेशवर विश्वास ठेवू नका .

२) वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते  अशा भ्रमणध्वनी एप्स वरून oxygen च्या प्रमाणाचे आकडे हे अचूक नसतात .

३) मुळात pulse - pulse -oxy meter या उपकरणात वापरली गेलेली प्रणाली व या भ्रमणध्वनी एपमधील सॉफ्टवेअर या मध्ये बराच फरक आहे . त्या प्रणाली मध्ये वैद्यकीय निकष वापरले गेले आहेत जे या भ्रमणध्वनी एपमध्ये नाहीत .

४)अशी भ्रमणध्वनी एप ही सुरक्षित नाहीत व त्यांचा उपयॊग सायबर भामटे तुमच्या भ्रमणध्वनीमधील सर्व माहिती मिळवण्यासाठी करू शकतात .

५) शक्यतो अशी भ्रमणध्वनी एप  वापरणे टाळा.

६) जर अशी कोणतीही भ्रमणध्वनी एप तुम्ही वापरत असाल तर आपल्या भ्रमणध्वनीच्या  settings मध्ये जाऊन या एप्सना ठराविकच access allow करा.केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. कृपया घरीच थांबावे व कारण नसल्यास घराच्या बाहेर पडू नये.असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभाग विशेष पोलीस महानिरीक्षक यांचेमार्फत करण्यात आले आहे



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा