मित्रच ठरला वैरी

 Mayuresh Park
मित्रच ठरला वैरी

टेंभीपाडा - किरकोळ वादातून भाजीविक्रेत्या मित्रावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संतोष मेघेशियाला मंगळवारी रात्री भांडूप पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. यामध्ये संतोषच्या तीन पसार साथिदारांचा शोध पोलीस करत आहेत. हल्ल्यातील जखमी झालेल्या प्रशांत मिश्र याच्यावर अद्यापही उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. संतोष हा देखील भाजीविक्रेता आहे. काही दिवसांपूर्वी प्रशांत मिश्र आणि संतोष यांच्यात चायनीच खाताना वाद झाला होता. याच वादातून मेघेशिया यांनं मिश्र याच्यावर तीन साथीदारांच्या मदतीनं स्क्रू ड्रायव्हर, कोयता आणि चाकूनं जीवघेणा हल्ला करून पळ काढला होता.

Loading Comments