हुसैनिया इमारत दुर्घटना, ट्रस्ट विरोधात गुन्हा दाखल


हुसैनिया इमारत दुर्घटना, ट्रस्ट विरोधात गुन्हा दाखल
SHARES

भेंडी बाजारमधील पाकमोडिया स्ट्रीट येथील हुसैनिया इमारत कोसळून 34 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी इमारतीच्या मालकी हक्क असलेल्या ट्रस्ट आणि इतरांवर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

28 मार्च 2011 पासूनच हुसैनिया ही इमारत धोकादायक असल्याची माहिती वारंवार म्हाडाने दिली. राहण्यास धोकादायक असलेली ही इमारत तोडण्याची परवानगी देखील म्हाडाने दिली होती. तरीदेखील ती वेळीच रिकामी न करता अनेक रहिवासी त्या धोकादायक इमारतीत राहात होते. अखेर 31 ऑगस्ट रोजी ही इमारत कोसळली आणि त्यात 34 जणांना आपले प्राण गमवावे लागले. यामध्ये 16 जण जखमीही झाले. या प्रकरणी सैफी बुरहानी अपलिफ्टमेंटचे अधिकारी आणि इतर जणांविरोधात जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जे. जे. मार्ग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या प्रकरणी अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा - 

भेंडीबाजार इमारत दुर्घटना, 34 जण ठार


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा