लाचखोर भाजपा नगरसेविकाला ५ वर्षांचा कारावास

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वर्षा भानुशाली हिला लाच घेताना रंगेहाथ पकडलं होतं.

SHARE

मीरा भाईंदर महापालिकेतील भाजपाची लाचखोर नगरसेविका वर्षा गिरीधर भानुशाली हिला ठाणे न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेसह ५ लाखांच्या दंडाची शिक्षाही न्यायालयाने दिली आहे.  दंड न भरल्यास वर्षा भानुशाली हिला आणखी ६ महिन्याचा कारावास भोगावा लागणार आहे, 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ६ जून २०१४ रोजी वर्षा भानुशाली हिला लाच घेताना रंगेहाथ पकडलं होतं.  एका गाळ्याची बेकायदेशीर उंची वाढवण्यासाठी वर्षा भानुशाली हिने १ लाख ६० हजार रुपयांची लाच मागितली होती. या लाचेचा ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्षा भानुशाली हिला अटक केली होती.  २००७ सालच्या महापालिका निवडणूकीत वर्षा भानुशाली आणि नरेंद्र मेहता हे एकत्र पॅनल मधून अपक्ष म्हणून निवडून आले होते.हेही वाचा -

नॅशनल पार्कमधील वन्यप्राण्यांची होणार डीएनए चाचणी, महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य

मुंबईतील डोंगरी मार्केटमध्ये कांद्याची चोरी
संबंधित विषय
ताज्या बातम्या