मुंबईतील डोंगरी मार्केटमध्ये कांद्याची चोरी

कांदा घेणं परवडत नसल्यानं चोरांनी आता कांद्यावर निशाणा साधला आहे.

मुंबईतील डोंगरी मार्केटमध्ये कांद्याची चोरी
SHARES

कांद्याच्या वाढत्या दरानं मुंबईसह राज्यभरातील नागरिकांना रडवलं आहे. बाजारात प्रतिकिलो कांदा १५० रुपये झाला असल्यानं कांदा खरेदी करण्यासाठी खिशाला कात्री लागत आहे. त्यामुळं कांदा घेणं परवडत नसल्यानं चोरांनी आता कांद्यावर निशाणा साधला आहे. डोंगरीच्या भाजी मार्केटमधून सुमारे १६८ किलो कांदा चोरण्यात आला आहे. याप्रकरणी डोंगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी २ चोरांना अटक केली आहे.

कांद्याच्या गोणी गायब

डोंगरीच्या नवरोजी हिल रोडवरील मार्केटमध्ये अकबर शेख यांचा कांदा बटाटा विक्रीचा अधिकृत स्टॉल आहे. अकबर यांनी ५ डिसेंबर रोजी कांद्याच्या २२ गोणी या स्टॉलमध्ये ठेवल्या होत्या. या २२ गोण्यांमध्ये ११२ किलो कांदा होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता अकबर यांनी नेहमीप्रमाणे स्टॉल उघडला असता कांद्याच्या सर्व गोणी गायब होत्या. त्यांनी मार्केटमध्ये आजूबाजूच्या स्टॉलमध्ये चौकशी केली असता इरफान शेख या विक्रेत्याच्या स्टॉल मधून ५६ किलो कांदे असलेली एक गोणी चोरीला गेल्याचं उघडकीस आलं.

कांदे चोरीला

कांदे चोरीला गेल्याचं लक्षात येताच दोन्ही व्यापाऱ्यांनी डोंगरी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. १२० रुपये किलो दरानं १६८ किलो म्हणजे २१ हजार १६० रुपयांचा कांदा चोरीला गेल्याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परिसरातील सीसीटीव्ही तसंच खबरे यांच्या माध्यमातून चोराचा शोध घेतला जात अाहे.



हेही वाचा -

शाळेतील विद्यार्थ्यांना घंटा वाजवून पाणी पिण्याची आठवण

SBI ने १२ हजार कोटींची थकीत कर्जे लपवली



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा