Advertisement

SBI ने १२ हजार कोटींची थकीत कर्जे लपवली

रिझर्व्ह बँकेने केलेल्या तपासानुसार एसबीआयची एकूण १ लाख ८४ हजार ६८२ कोटी रुपयांची थकीत कर्जे होती.

SBI ने १२ हजार कोटींची थकीत कर्जे लपवली
SHARES

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय) ने आपली थकीत कर्जे लपवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील वर्षात एकूण थकीत कर्जांपैकी १२ हजार कोटी रुपयांची थकीत कर्जे एसबीआयच्या ताळेबंदातून गायब झाल्याचं रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आलं आहे.  

रिझर्व्ह बँकेने केलेल्या तपासानुसार एसबीआयची एकूण १ लाख ८४ हजार ६८२ कोटी रुपयांची थकीत कर्जे होती. मात्र, बँकेने २०१८-१९ या वर्षी १ लाख ७२ हजार ७५० कोटी रुपयांची थकीत कर्जे असल्याचं घोषित केलं. बँकेची निव्वळ थकीत कर्जे ७७ हजार ८२७ कोटींची आहेत. मात्र,  लेखा परीक्षण अहवालात बँकेने ६५ हजार ८९५ कोटींची दाखवली आहेत. त्यामुळे यामुळे एकूण कर्जे आणि जाहीर केलेली थकीत कर्जे यामध्ये ११ हजार ९३२ कोटींची तफावत असल्याचं समोर आलं आहे. ही थकीत कर्जे कुठे गायब करण्यात आली असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बँकांकडून ताळेबंदात किंवा लेखा परीक्षणात थकीत कर्जे कमी दाखण्याचे प्रकार वाढले आहेत.  अशा बँकांवर रिझर्व्ह बँकेने कारवाईही केली आहे. एसबीआयसारख्या देशातील सर्वात मोठ्या बँकेने थकीत कर्जात घोळ केल्याने रिझर्व्ह बँक काय भूमिका घेणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. 



हेही वाचा  -

SBI पाठोपाठ HDFC बँकेचंही कर्ज स्वस्त

मंगलप्रभात लोढा सर्वाधिक श्रीमंत बांधकाम उद्योजक, 'इतकी' आहे त्यांची संपत्ती




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा