SBI पाठोपाठ HDFC बँकेचंही कर्ज स्वस्त

स्टेट बँक ऑफ इंडिया पाठोपाठ आता एचडीएफसी बँकेनेही आपल्या कर्जावरील व्याजदर कमी केला आहे.

SHARE

स्टेट बँक ऑफ इंडिया पाठोपाठ आता एचडीएफसी बँकेनेही आपल्या कर्जावरील व्याजदर कमी केला आहे.  बँकेनं एमसीएलआरच्या दरात ०.१५ टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे एचडीएफसीचं गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त होणार आहे. नवे दर ७ डिसेंबरपासून लागू करण्यात आली असल्याची माहिती बँकेनं आपल्या वेबसाईटवरून दिली आहे. 

एचडीएफसी बँकेनं  याआधी नोव्हेंबर महिन्यात  एमसीएलआरच्या दरात ०.१० टक्क्यांची कपात केली होती. यापूर्वी स्टेट बँकेने एका वर्षासाठी एमसीएलआरच्या दरात ०.१० टक्क्यांची कपात केली आहे. १० डिसेंबरपासून स्टेट बँकेचे नवे दर लागू होणार आहेत. स्टेट बँकेचा एमसीएलआर ८ टक्क्यांवरून ७.९० टक्क्यांवर आला आहे.

एमसीएलआर म्हणजे काय?
व्याजदर निश्चित करण्यासाठी आरबीआयने एमसीएलआरची (Marginal Cost of funds based Lending Rate) अंमलबजावणी एक एप्रिल २०१६ पासून सुरु केली. कर्जाचा व्याजदर किती असावा यासाठी एक प्रणाली बँकांमध्ये कार्यरत असते त्याला एमसीएलआर म्हणतात. बँकांनी हा दर बदलला तर कर्जाचे व्याजदरही बदलतात.हेही वाचा  -

SBI चे गृह, वाहन कर्ज स्वस्त

मंगलप्रभात लोढा सर्वाधिक श्रीमंत बांधकाम उद्योजक, 'इतकी' आहे त्यांची संपत्ती
संबंधित विषय
ताज्या बातम्या