Advertisement

SBI चे गृह, वाहन कर्ज स्वस्त

चालू आर्थिक वर्षात एसबीआयने सलग आठ वेळा एमसीएलआरमध्ये कपात करून आपलं कर्ज स्वस्त केलं आहे.

SBI चे गृह, वाहन कर्ज स्वस्त
SHARES

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने एमसीएलआर (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड) दरात ०.१० टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे एसबीआयचे एमसीएलआरशी संबंधीत गृह, वाहन आणि अन्य कर्ज स्वस्त होणार आहेत. नवीन दर १० डिसेंबरपासून लागू होणार आहेत.

चालू आर्थिक वर्षात एसबीआयने सलग आठ वेळा एमसीएलआरमध्ये कपात करून आपलं कर्ज स्वस्त केलं आहे.  एमसीएलआरशी संबंधित असलेल्या सर्व कर्जधारकांना लगेच या कपातीचा फायदा मिळणार नाही.  कपातीचा फायदा होणार की नाही हे रीसेट डेटवर अवलंबून असेल. एमसीएलआर आधारीत कर्जांमध्ये रीसेट पीरियड एक वर्षांचा असतो. ज्या ग्राहकांची रीसेटची तारीख १० डिसेंबर किंवा त्यानंतर आहे त्यांना फायदा मिळे. म्हणजे त्यांच्या कर्जावरील व्याजदर कमी होईल. रीसेटची तारीख निघून गेली असेल तर त्यांना वाट पाहावी लागेल. तसंच नवीन ग्राहकांनी एमसीएलआर आधारीत कर्जाचा पर्याय स्वीकारला तर त्यांना कमी केलेल्या व्याजदराचा फायदा मिळेल.

एमसीएलआर म्हणजे काय?
व्याजदर निश्चित करण्यासाठी आरबीआयने एमसीएलआरची (Marginal Cost of funds based Lending Rate) अंमलबजावणी एक एप्रिल २०१६ पासून सुरु केली. कर्जाचा व्याजदर किती असावा यासाठी एक प्रणाली बँकांमध्ये कार्यरत असते त्याला एमसीएलआर म्हणतात. बँकांनी हा दर बदलला तर कर्जाचे व्याजदरही बदलतात.हेही वाचा  -

आयटी रिटर्न भरण्यासाठी ३१ डिसेंबर अंतिम मुदत

'ह्या' मार्गाने पीपीएफमध्ये करा ऑनलाइन पैसे जमा
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा