Advertisement

'ह्या' मार्गाने पीपीएफमध्ये करा ऑनलाइन पैसे जमा

पीपीएफ खात्यावर पैसे ऑफलाइनसह ऑनलाइनही जमा करता येतात. पीपीएफमध्ये ३ प्रकारे आॅनलाइन पैसे जमा केले जाऊ शकतात.

'ह्या' मार्गाने पीपीएफमध्ये करा ऑनलाइन पैसे जमा
SHARES

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) ही निश्चित परताव्याची हमी देणारी एक दीर्घकालीन बचत गुंतवणूक योजना आहे.  सरकारने १९६८ मध्ये पीपीएफ योजना सुरू केली. या योजनेत आपण पैसे बचत म्हणून सरकारकडे जमा करतो. योजनेचा कालावधी संपल्यावर सरकार आपले पैसे व्याजासहीत देते.

कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत आणि पोस्ट आॅफिसमध्ये पीपीएफ खाते उघडता येते. सध्या पीपीएफवर ७.९ टक्के व्याजदर मिळत आहे. या खात्यात तुम्ही कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त  १.५ लाख रुपये एक वर्षाच्या कालावधीत जमा करु शकतात.  पीपीएफ खात्यावर पैसे ऑफलाइनसह ऑनलाइनही जमा करता येतात. पीपीएफमध्ये ३ प्रकारे आॅनलाइन पैसे जमा केले जाऊ शकतात.

ईसीएस

ईसीएस आदेशाद्वारे आपण आपल्या बँक खात्यातून पीपीएफ खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. प्रथम पीपीएफ खात्यातून ईसीएस आदेश निश्चित करावा लागेल. या प्रक्रियेत खात्यातून पैसे कापून पीपीएफमध्ये जमा केले जातात. ही प्रक्रिया आंतरबँक पैसे हस्तांतरित करण्यासाठी वापरली जाऊ शकते.

बँकेला सूचना

समजा जर बचत खाते आणि पीपीएफ एकाच शाखेत असतील तर या प्रक्रियेसाठी ग्राहकाने बँकेला माहिती द्यावी लागेल. बचत खात्यातून दर महिन्याला किती पैसे पीपीएफमध्ये हस्तांतरित करायचे याची सूचना खातेधारक बँकेला देऊ शकतो.  आर्थिक वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये हस्तांतरित केले जाऊ शकतात. तुमच्या वतीने बँकेला माहिती दिल्यानंतर बँक आपोआप बचत खात्यातील पैसे पीपीएफ खात्यावर पाठवते.

एनईएफटी 

 नेट बँकिंगद्वारेही पीपीएफ खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.  एनईएफटीने पैसे जमा करण्यासाठी पीपीएफ खाते क्रमांक आणि बँक शाखेचा आयएफएससी कोड वापरला जाईल. एनईएफटी बचत खाते आणि चालू खात्यातून करता येते. यासाठी ३० मिनिटे लागतील, तर इंट्रा बँक प्रक्रियेस काही मिनिटे किंवा तास लागू शकतील. 



हेही वाचा  -

पीपीएफ : सरकारी हमीचा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा