मंगलप्रभात लोढा सर्वाधिक श्रीमंत बांधकाम उद्योजक, 'इतकी' आहे त्यांची संपत्ती

यादीमध्ये समाविष्ट झालेल्या इतर ९९ भारतीय बांधकाम उद्योजकांच्या एकूण संपत्तीपैकी १२ टक्के संपत्ती लोढा कुटुंबाची आहे.

SHARE

देशातील बांधकाम क्षेत्रातील ( रिअल इस्टेट) सर्वात श्रीमंत उद्योजकांच्या यादीत लोढा डेव्हलपर्सचे मंगलप्रभात लोढा आणि त्यांचं कुटुंब पहिल्या स्थानावर आहे. लोढा कुटुंबाची एकूण मालमत्ता तब्बल ३१ हजार ९६० कोटी रुपये आहे. हुरुन रिपोर्ट आणि ग्रोही इंडियाने  ‘ग्रोही हुरुन इंडिया रिअल इस्टेट रिच लिस्ट २०१९' ही बांधकाम क्षेत्रातील देशातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत डीएलएफचे राजीव सिंह दुसऱ्या आणि एम्बसी समूहाचे संस्थापक जितेंद्र विरवानी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 

मंगलप्रभात लोढा हे भाजपाचे मुंबईतील आमदार आहेत. या यादीनुसार, लोढा देशातील सर्वाधिक श्रीमंत बांधकाम उद्योजक आहेत. २०१९ मध्ये लोढा कुटुंबाच्या संपत्तीत १८ टक्के वाढ झाली आहे. यादीमध्ये समाविष्ट झालेल्या इतर ९९ भारतीय बांधकाम उद्योजकांच्या एकूण संपत्तीपैकी १२ टक्के संपत्ती लोढा कुटुंबाची आहे. डीएलएफचे राजीव सिंह यांची एकूण संपत्ती २५ हजार ८० कोटी रुपये आहे. 

 या उद्योजकांच्या ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या मालमत्तेच्या आधारे ही यादी तयार केली गेली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत हिरानंदानी कम्युनिटीज ग्रुपचे निरंजन हिरानंदानी १७ हजार कोटींच्या संपत्तीसह चौथ्या तर रहेजा समूहाचे चंदू रहेजा आणि कुटुंब १५,४८० कोटींच्या संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहेत. ओबरॉय रीयल्टी के विकास ओबरॉय सहाव्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती १३,९१० कोटी रुपये आहे. 

रिअल इस्टेट क्षेत्रातील दहा श्रीमंत उद्योजकांपैकी सहा मुंबईतील असल्याचं या अहवालात म्हटले आहे. शंभर श्रीमंतंपैकी ३७ जण मुंबईतील आहेत. या यादीमध्ये दिल्ली आणि बंगळुरू येथील प्रत्येकी १९ उद्योजकांची नावे आहेत.हेही वाचा  -

MNP प्रक्रिया ५ दिवस बंद, 'हे' आहे कारण

SBI चे गृह, वाहन कर्ज स्वस्त
संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ