शाळेतील विद्यार्थ्यांना घंटा वाजवून पाणी पिण्याची आठवण

विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण व्हावी यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना आता घंटा वाजजून पाणी पिण्याची आठवण करून दिली जाणार आहे.

SHARE

आपलं शरीर तंदुरूस्त राहण्यासाठी शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त असणं गरजेचं असतं. अनेकदा डॉक्टरही याबाबत सल्ला देतात. परंतु, यासारख्या अनेक गोष्टीकडं दुर्लक्ष करण्यात येत. तसंच, शाळेत जाणारी अनेक विद्यार्थी वेळेत व शरीराला पुरेस पाणी पीयत नाहीत. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या पाण्याच्या बाटल्या घरी जातानाही भरलेल्या असतात. अशा विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण व्हावी यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना आता घंटा वाजजून पाणी पिण्याची आठवण करून दिली जाणार आहे.

३ वेळा घंटा

जिल्हा परिषदेच्या शाळेच्या धर्तीवर एका सत्रात किमान ३ वेळा घंटा वाजवण्यात यावी, असा आग्रह शिवसेनेने धरला आहे. तसा ठराव महापालिका सभागृहात मांडण्यात आला आहे. शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी ही मागणी केली आहे. या ठरावाला डिसेंबर महिन्यात मंजुरी देऊन तो ठराव महापालिका आयुक्तांमार्फत पालिकेच्या शिक्षण विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. या मागणीला शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शवली आहे. पालिका आयुक्तांच्या आदेशानंतरच याची अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे.

पाणी पिण्याकडं दुर्लक्ष

अन्न पचविणं, रक्ताभिसरण सुलभ करणं, पोषण मूल्ये सर्व अवयवांपर्यंत पोहोचवणं, शरीराचं तापमान समतोल राखणं, आदी महत्त्वपूर्ण कार्य शरीरातील पाणी करतं. त्यामुळं दिवसभरात ठराविक वेळेच्या अंतरानं आवश्यक प्रमाणात पाणी पिणं हे आरोग्याच्या दृष्टीनं आवश्यक आहे. परंतु, शाळेत जाणाऱ्या मुलांचं पाणी पिण्याकडं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आलं आहे. मुलांचा दिवसातील ५ ते ७ तासांचा कालावधी शाळेत जातो. या कालावधीत किमान ३ वेळा पाणी पिणं आवश्यक आहे. अभ्यास, खेळ यामुळं अनेक विद्यार्थी पाणीच पित नाहीत. अनेक लहान मुले सकाळी घरातून नेलेले पाणी पुन्हा घरी घेऊन येतात. त्यामुळे राज्यातील अनेक शाळांमध्ये प्रत्येक सत्रात तीनवेळा घंटा वाजवून पाणी पिण्याची आठवण करून देण्यात येते.हेही वाचा -

मुंबईच्या पाण्यात आढळले 'वांद्रा' व 'कुर्ला' व्हायरस

'कॅब' विधेयकावरून शिवसेनेचं भांगडा पाॅलिटिक्स सुरू, ओवेसी यांची बोचरी टीकासंबंधित विषय
ताज्या बातम्या