रक्षा खडसे यांचा भाजप वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख, गृहमंत्री संतापले


रक्षा खडसे यांचा भाजप वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख, गृहमंत्री संतापले
SHARES

भारतीय जनता पक्षाच्या रावेल  येथील खासदार रक्षा खडसे यांच्या नावाचा उल्लेख त्यांच्याच पक्षाच्या (भाजप) अधिकृत संकेतस्थळावर आक्षेपार्ह पद्धतीने करण्यात आला आहे. या गंभीर प्रकाराचा एक स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला. घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल ही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेत, संबधितांवर कारवाई करा अन्यथा राज्याच्या सायबर सेल कारवाई करेल असा स्पष्ट संकेत देशमुखांनी दिला.

खासदार रक्षा खडसे यांची भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर ओळख दिली आहे. ही ओळख देताना रक्षा खडसे यांचे छायाचित्र आणि त्याखाली त्यांच्या नावासोबत 'होमोसेक्शुअल'  असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकाराचा स्क्रनिशॉट व्हायरल झाल्यानंतर भाजपने संकेतस्थळावर घडलेली चूक सुधारत नवे अपडेट केले आहे. आता रक्षा खडसे यांच्या नावाखाली त्यांच्या मतदारसंघाचे नाव दिसत आहे. खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत घडलेल्या प्रकारनांतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे जी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपा आपण दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल.”

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा