कुर्ला खाडीत लागली आग

 Kurla
कुर्ला खाडीत लागली आग

कुर्ला - कुर्ल्याच्या कुरैशनगर हिल एटमबॉम मस्जिदच्या मागच्या खाडीत आग लागल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. या खाडीत मोठ्या प्रमाणात कचरा आणि निर्माल्य फेकलं जातं. त्यामुळे आगीने लगेचच रौद्र रुप धारण केलं. कोणीतरी पेटती सिगारेट या खाडीत फेकल्यमुळे ही आग लागल्याचं स्थानिक सांगतात. आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला दिली असता 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.

Loading Comments