'बीग बीं'च्या घराबाहेर आग

जुहू - बीग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याजवळ आग लागण्याची घटना घडली आणि स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली. बंगल्या जवळच असलेल्या कुन्दनगौर मंहरलाल संघवी शाळेबाहेर उभ्या असलेल्या व्हॅनने अचानक पेट घेतला. सोमवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली. ड्रायव्हर व्हॅन चालूच ठेवून मुलांना शाळेत सोडायला गेला तेव्हा व्हॅनने पेट घेतला. आग वाढल्यामुळे व्हॅनच्या बाजूला असलेल्या दोन गाड्यांनीही पेट घेतला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून तातडीने आग विझवली.

Loading Comments