कुरिअरच्या माध्यामातून परदेशात पाठवणार होता ड्रग्ज, ३८ लाखांचा साठा जप्त

हे ड्रग्ज पुण्याच्या एका कुरिअर कंपनीच्या माध्यमातून मुंबईला आणण्यात येणार होते. त्यानंतर मुंबईत चोरून ते आँस्ट्रेलियाला पाठवले जाणार होते.

कुरिअरच्या माध्यामातून परदेशात पाठवणार होता ड्रग्ज, ३८ लाखांचा साठा जप्त
SHARES
दिल्ली एअरपोर्टवर शेंगाच्या टरफल्यातून, बिस्कीटाच्या पाकिटातून परदेशी चलनाची तस्करी करणाऱ्याचा पर्दाफाश केला असतानात, मुंबईतल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पोलिसांनी कुरिअर मार्फत ड्रग्जची आँस्ट्रेलिय़ा येथे तस्करी करू पाहणाऱ्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याजवळून प्युसडोमैफिड्रीन नावाचे 
 तब्बल 38 किलोचा साठा जप्त केला आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो तर्फे पुण्यातून कुरिअरच्या नावाखाली मुंबई आणि मुंबई मार्गे ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येणाऱ्या ड्रग्सची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. हे ड्रग्ज पुण्याच्या एका कुरिअर कंपनीच्या माध्यमातून मुंबईला आणण्यात येणार होते. त्यानंतर मुंबईत चोरून ते आँस्ट्रेलियाला पाठवले जाणार होते. त्यानुसार अंधेरी परिसरातल्या कुरियर कंपनीवर धाडी टाकून हे ड्रग्स ताब्यात घेण्यात आले आहे

 याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून काळूराम महापुरे वय 42 वर्षे असं या अटक आरोपीचे नाव आहे. पोलिस तपासात काळूराम महापूरे याच्या पुण्यातील  घरातून आणखी 38 किलो ड्रग्स चा साठा सापडला असल्याची माहिती एनसीबी ने दिलीय. 

अंमली पदार्थांची होणारी तस्करी दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत हेरॉईन, चरस, कोकेन, गांजा, एमडी, एलसीडी हे पदार्थ १३६३ किलो ३२४१ ग्रॅम १३६४ मिली ग्रॅम जप्त केले आहेत. हस्तगत केलेल्या या मुद्देमालाची किंमत १०१६ कोटी ३२ लाख ५६ हजार रुपये असून यामध्ये एकूण ३९५ आरोपींना अटक झाली होती. यामधील सर्वाधिक आरोपी गांजाचे सेवन करत असून त्यांची संख्या १९४ आहे.

१ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत ६४ कोटी ६४ लाख ६२ हजार ३५२ रुपये किंमतीचे १६९ किलो ४१५० ग्रॅम १२८२ मिली ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. यंदा आरोपींच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असून, एकूण ६७८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही आकडेवारी पाहता मुंबईला नशेच्या विळख्याने कशा प्रकारे घेरले आहे. याचा अंदाज न लावलेलाच बरा.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा