थर्टी फर्स्ट पार्टीवर महापालिका ठेवणार करडी नजर

नव्या वर्शात पदार्पण आणि चालू वर्षाची सांगता करण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री थर्टी फर्स्ट पार्टी साजरी केली जाते.

थर्टी फर्स्ट पार्टीवर महापालिका ठेवणार करडी नजर
SHARES

वर्षाचा अखेरचा दिवस म्हणजे ३१ डिसेंबर या दिवशी सर्वत्र थर्टी फर्स्ट साजरा केला जातो. नव्या वर्शात पदार्पण आणि चालू वर्षाची सांगता करण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री थर्टी फर्स्ट पार्टी साजरी केली जाते. लहानांपासून ते अगदी मोठी माणसं या पार्टीचा आनंद लुटतात. पण सध्या सर्वत्र कोरोनाचं सावट असल्यानं थर्टी फर्स्ट पार्टीत होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिका या पार्ट्यांवर नजर ठेवणार आहे.

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नववर्षाच्या पूर्वसंध्येसाठी (थर्टी फर्स्ट) सध्या जोरदार तयारी सुरु आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे बहुतांश लोकांना थर्टी फर्स्ट साजरा करता आला नव्हता. त्यामुळं यंदाच्या थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनचा जोर अधिक असणार आहे.

यासाठी विविध हॉटेल्स आणि रेस्टॉरंटसनी आत्तापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईत अनेक ठिकाणी गर्दी होणार हे गृहीत धरुन मुंबई महानगरपालिकेनेही धोरण आखले आहे.

गर्दीच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं ३१ डिसेंबरला सभागृह, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटस फक्त ५० टक्के क्षमतेनेच चालवण्याची अट घातली आहे. ३१ डिसेंबरला मुंबईत अनेक ठिकाणी मोठमोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांवर महापालिकेकडून करडी नजर ठेवली जाणार आहे.

यासाठी प्रत्येक वॉर्डात महापालिकेकडून २ टेहळणी पथके तैनात केली जातील. वॉर्ड मोठा असल्यास आणि गरज पडल्यास ४ पथके तैनात केली जातील. ही पथके सर्व ठिकाणी नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवणार आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा