महापालिका अधिकाऱ्यांना धक्काबुक्की

 Mumbai
महापालिका अधिकाऱ्यांना धक्काबुक्की
महापालिका अधिकाऱ्यांना धक्काबुक्की
See all

मस्जिद बंदर - दानाबंदर परिसरात 20 जानेवारीला पालिकेच्या बी विभागातर्फे अवैध बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या वेळी तिथे उपस्थित असणाऱ्या चौघांनी कारवाईत अडथळा आणला. या चौघांविरोधात पायधुनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला आहे. निलेश मिठबावकर, प्रतिक म्हेत्रे, समीर अस्लम शेख अशी तिघा आरोपींची नावे असून चौथ्या आरोपीचे नाव समजलेले नाही. या चौघांनी कारवाईच्यावेळी सहाय्यक अभियंता अतुल कोल्हे, सहाय्यक कनिष्ठ अभियंता सचिन खरात, कनिष्ठ अभियंता भुषण चौधरी आणि इतर कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. या घटनेची चौकशी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पाटील करत आहेत.

ही कारवाई जनतेच्या भल्यासाठी आणि अनधिकृत बांधकामाविरोधात होती. त्यात तिथल्या जनतेने सहकार्य करावे ही अपेक्षा होती. पण सहकार्य न करता तिथल्या चार जणांनी गैरवर्तन केले. त्या चार जणांविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्यांचे काम करतीलच," असे उदयकुमार शिरुरकर यांनी सांगितले.

Loading Comments