इमारतीचा स्लॅब कोसळून एक ठार

 Girgaon
इमारतीचा स्लॅब कोसळून एक ठार
इमारतीचा स्लॅब कोसळून एक ठार
See all

गिरगाव - येथील मोहन इमारतीच्या गच्चीचा एक भाग दुपारी कोसळला. या अपघातात वामन निरुरकर या मिरारोड येथील 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय. निरूरकर इमारतीखालून जात असताना हा अपघात झाला. दुपारी या इमारतीजवळ झाडाच्या वाढलेल्या फांद्या कापण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आलेले. यावेळी एक फांदी कापताना तिला लटकलेली वायर न काढल्याने फांदी पुर्णत कापल्यानंतर सर्व फांदीचा भार समोरील स्लँब वर गेला आणि स्लँब कोसळला. त्यातच वामन निरुरकरांचा मृत्यू झाला.

Loading Comments