Advertisement

मुंबईच्या मालाड मार्वेच्या समुद्रात बोट बुडाली, 4 जणांना वाचवण्यात यश 3 जणांचा शोध सुरू


मुंबईच्या मालाड मार्वेच्या समुद्रात बोट बुडाली, 4 जणांना वाचवण्यात यश 3 जणांचा शोध सुरू
SHARES

मालाडच्या मार्वे समुद्रात मासेमारीसाठी गेलेली एक बोट बुडाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या बोटीत सात जण होते. त्यातील 4 जणांना वाचवण्यात यश आले असून 3 जणांचा शोध अद्याप सुरू आहे. सध्या जीवरक्षकांनी या तीन मुलांचा शोध घेण थांबवले असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.

मालाडच्या मार्वे येथील समुद्रात दुपारी 1:30 च्या सुमारास ही बोट गेली होती. या बोटीत सातसजण प्रवास करत होते. माञ अचानक बोट बुडल्याची माहिती  नियंञण कक्षाला मिळाली. नेमकं कशामुळे ही बोट बुडाली हे अद्याप समजू शकलेले नाही. माञ बोटीवरील चार जणांवा वाचवण्यात जीवरक्षकांना यश आले. माञ या बोटीवरील तीन जण अद्याप बेपत्ता आहे. समुद्रात वाढलेले पाणी पाहता. जीवरक्षकांनी आता शोधकार्य थांबवले असून त्यांनी या घटनेचीमाहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेत, वाचवण्यात आलेल्या चौघांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर इतर तीन जणांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाची मदत घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा