नौदलाच्या दोन पाणबुड्यांना वाचवण्यात यश

 Pali Hill
नौदलाच्या दोन पाणबुड्यांना वाचवण्यात यश

मुंबई - शनिवारी रात्री बेपत्ता झालेल्या नौदलाच्या दोन पाणबुड्यांना वाचवण्यात यश आले आहे. हे पाणबुडे मुंबईजवळील समुद्रात बुडालेल्या दत्त साई या मच्छिमार बोटीवरील खलाशाला वाचवण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर बेपत्ता झाले होते.

शनिवारी मुंबईपासून 30 नॉटिकल मैल अंतरावर दत्त साई ही नौका बुडाली होती. बोटीत एकूण 17 खलाशी होते, त्यापैकी 14 खलाशांना याआधीच वाचण्यात आले आहे. काल संध्याकाळी आयएनएस त्रिशूल ला एक खलाशी दिसला होता. त्याला वाचवण्यासाठी दोन पाणबुडे पाण्यात उतरले होते. तेव्हापासून हे पाणबुडे बेपत्ता होते. अखेर आज सकाळी त्यांचा शोध लागला.

Loading Comments