धक्कादायक! पालिका कर्मचाऱ्यांच्या नावाने सील केलेल्या इमारतीत कोरोनाची चाचणी करणाऱ्यांना अटक


धक्कादायक!  पालिका कर्मचाऱ्यांच्या नावाने सील केलेल्या इमारतीत कोरोनाची चाचणी करणाऱ्यांना अटक
SHARES
पालिका कर्मचारी असल्याचे सांगून पालिकेने कोरोनाच्या पाश्वभूमिवर सिल केलेल्या इमारतीत  नागरिकांचे बाँडी टेंप्रेचर तपासणाऱ्या तिघांना काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत चौघुले, अक्षय चव्हाण, दिपक वाघ, यांच्यावर गुन्हा नोंदवत अटक केली आहे.



ऐकीकडे प्रशासन कोरोना सारख्या महामारीशी दोन हात करत असताना, दुसरीकडे बेजबाबदार नागरिकांना आवरताना प्रशासनाची दमछाक होताना दिसत आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका. पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकञ जमू नका, तोंडाला मास्क लावा असे वारंवार सांगून ही अनेक बेशिस्त बिन दिक्कत रस्त्यावर फिरताना आढळतात. काळाचौकीत ही अशीच काहीशी घटना समोर आली आहे. कुठलाही शासकिस परवाना नसताना, पालिकेने कोरोना रुग्णामुळे सील केलेल्या इमारतीत हे तिघे तपासणी बाँडी टेंप्रेचर घेऊन नागरिकांची तपासणी करू लागले. नागरिकांनी या तिघांना कुठून आलात हे विचारल्यानंतर त्यांनी पालिकेचे कर्मचारी असल्याचे सांगितले.


त्यांच्या वागणूकीवर संशय आल्याने रहिवाशांनी त्यांच्याजवळ ओळखपञाची मागणी केली आणि त्यांचा पोलखोल झाला. पालिका कर्मचारी नसताना सील केलेल्या इमारतीत जाऊन नागरिकांची तपासणी करणाऱ्यांना नागरिकांनी चांगलीच अद्दल घडवली. या घटनेची माहिती काळाचौकी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत तिघांवर गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली. या तिघांवर 188, 269,170 भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून हे तिघे करीरोडचे रहिवाशी आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा