अभिनेता अरमान कोहलीची गर्लफ्रेंडला मारहाण, गुन्हा दाखल


अभिनेता अरमान कोहलीची गर्लफ्रेंडला मारहाण, गुन्हा दाखल
SHARES

दिग्दर्शक राजकुमार कोहलींचा मुलगा अभिनेता अरमान कोहली पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडाल आहे. प्रेयसीला केलेल्या गंभीर मारहाणप्रकरणी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात अरमान विरोधात तक्रार दाखल झाली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेली प्रेयसी निरू रंधवा हिच्यावर अंधेरीच्या कोकीलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


का केली मारहाण?

काही वर्षांपूर्वी अरमान आणि निरू या दोघांची ओळख दुबाईतील एका पार्टीत झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्रीचे संबध होते. काही वर्षांपासून हे दोघेही सांताक्रूझ परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होते. गोवा येथील संपत्ती भाड्यावर देण्यावरून या दोघांमध्ये वारंवार भांडणं होत होती. याच कारणावरून रविवारीही या दोघांमध्ये भांडण झालं. या भांडणानंतर आरमानने गर्लफ्रेन्ड निरूला मारहाण केली. त्यात निरूचं डोकं भिंतीवर आदळल्याने तिच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी निरूला अंधेरीच्या कोकीलाबेन रुग्णालयात दाखल केलं.


निरूने केली तक्रार

याप्रकरणी निरूने सांताक्रूझ पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत अरमानने आपल्याला केसाला धरून मारहाण करत पायऱ्यावरून खाली ढकललं आणि डोकं भितींवर आदळल्याचं निरूने म्हटलं आहे. या प्रकरणानंतर अरमानला ताब्यात घेण्यासाठी पोलिस त्याच्या सांताक्रूझ येथील घरी गेले होते. मात्र अरमान मारहाणीनंतर फरार असून त्याचा मोबाइलही बंद असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा