ऋतिक- कंगना पून्हा आमने सामने, तो गुन्हा CIU कडे वर्ग

ऋतिकचा घटस्फोटनझाल्यावर (डिसेंबर,२०१३ मध्ये) त्याने पॅरिसमध्ये तिला प्रपोज केले होते, असे कंगनाने सांगितले होते.

ऋतिक- कंगना पून्हा आमने सामने, तो गुन्हा CIU कडे वर्ग
SHARES

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आपल्या प्रत्येक स्टेटमेंटमुळे कायम चर्चेत राहिलेल्या  अभिनेत्री कंगना राणौवत मुंबई पोलिसांच्या पून्हा एकदा निशाण्यावर आली आहे. अभिनेता ऋतिक रोशन-कंगाण राणौत यांच्यातील वाद २०१६ मध्ये चांगलाच रंगला होता. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला होता. हाच गुन्हा आता मुंबई पोलिसांच्या ‘सीआययू’ गुन्हे शाखा गुप्तवार्ता विभागाकडे तपासासाठी वर्ग केला आहे. दरम्यान, कंगना-हृतिक प्रकरणातील तपास सायबर सेलने गुन्हे शाखेकडे वर्ग केल्याने आणि त्यानंतर कंगनाने हृतिकला डिवचल्याने हा वाद आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. कंगनाच्या टीकेवर हृतिक रोशन काय उत्तर देतो, हे पाहावं लागेल.

हेही वाचाः- प्रभादेवीमध्ये गॅस गळतीच्या दोन तक्रारी, स्थानिक हादरले

कंगना राणौतने माझी बदनामी करण्यासाठी आणि मानसिक त्रास देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केल्याचा आरोप करत २०१६ साली हृतिक रोशनकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऋतिकचा घटस्फोटनझाल्यावर (डिसेंबर,२०१३ मध्ये) त्याने पॅरिसमध्ये तिला प्रपोज केले होते, असे कंगनाने सांगितले होते. त्यासाठी ऋतिकच्यावतीने पासपोर्टची माहिती सादर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. कंगनाने सन २०१४ मध्ये १४०० ऋतिकला पाठवले, जे सायबर गुन्ह्यांशी संबंधित आहे. मंगळवारी तपास करणार्यांपुढे सादर केलेल्या नवीन पुराव्या देखील या ईमेलशी संबंधित असल्याचे सूत्रांनी सांगितले. २०१६ च्या सुरुवातीला, एका मुलाखतीत ऋतिकबद्दल बोलताना तिने हृतिकचा उल्लेख ‘पूर्वाश्रमीचा मुर्ख प्रियकर’ असा केला होता. तिच्या या वक्तव्यामुळे ऋतिकने, कंगनाला कायदेशीर नोटीस बजावली होती.

हेही वाचाः- प्रभादेवीमध्ये गॅस गळतीच्या दोन तक्रारी, स्थानिक हादरले

कंगनाने माझी माफी मागावी असा संदेश त्याने या नोटीसमधून पाठवला होता. २०१६ ची सुरुवात या वादाने झाली तर वर्षाचा शेवटही याच वादाने झाला. हृतिकने त्याच्यासोबतचा कंगनाचा एक फोटो व्हायरल केला होता. तसेच दोघांमधील ऑनलाईन संभाषण वायरल केले होते. त्यावर हृतिक रोशनने आपल्या नावाने बनावट ईमेला पाठवलायाच दावा केला होता.  त्याप्रकरणी हृतिकच्या तक्रारीनंतर भादंवि कलम ४१९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर पोलिस याप्रकरणी तपास करत होते. पण आता याबाबत सीआययू तपास करणार आहे. याप्रकरणी ऋतिकचे वकिल महेश जेठमलानी यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहून याप्रकरणी कोणतीही प्रगती नसल्याबद्दल खंत व्यक्त केली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा