इमारतीच्या छतावर स्फोटके असल्याची अफवा

 lalbaug
इमारतीच्या छतावर स्फोटके असल्याची अफवा

करी रोड - करीरोड परिसरातल्या मॅरेथॉन फुटुरेक्स इमारतीच्या छतावर शनिवारी दुपारी स्फोटके असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ना.म.जोशी मार्ग पोलिसांसोबत बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दोन तास संपूर्ण इमारतीची आणि छताची तपासणी केली. पण पोलिसांना कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट आढळली नाही. त्यामुळे ही अफवा होती अशी माहिती ना. म. जोशी मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक संग्राम पाचे यांनी सांगितले.

Loading Comments