आर्यन खानची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली, वकिलांनी केला 'हा' युक्तिवाद

बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.

आर्यन खानची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली, वकिलांनी केला 'हा' युक्तिवाद
SHARES

बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आर्यन खान प्रकरणाची सुनावणी आजही अपूर्ण राहिली. आता पुढील सुनावणी गुरुवारी दुपारी होणार आहे.

आरोपी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला. आता गुरुवारी एनसीबीतर्फे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांचा युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर हायकोर्टाकडून लगेच आदेश दिला जाण्याची शक्यता आहे.

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

आर्यनच्या वतीनं मुकुल रोहतगी, सतिश मानशिंदे बाजू मांडत आहेत. तर अमित देसाई अरबाज मर्चंटच्या बाजूनं युक्तिवाद करत आहेत. सरकारी वकील अनिल सिंह न्यायालयात हजर आहेत.

मंगळवारी आर्यनच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र एकाच पक्षाची बाजू न्यायालयानं ऐकून घेतली. 

बुधवारी दुसरी बाजू ऐकल्यानंतर आर्यन खानच्या जामीनावरील सुनावणी पुन्हा अपूर्ण राहिली. जवळपास तीन आठवडे उलटून गेलेत तरी आर्यनला जामीन मिळालेला नाही.

विशेष म्हणजे प्रसिद्ध वकील आणि माजी अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी आर्यनची बाजू मांडत आहेत. सुरुवातीला एनसीबीच्या वकिलांनी युक्तिवाद केला आणि आर्यनला जामीन देण्यास विरोध केला. आर्यनला जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो, असं तपास यंत्रणेनं म्हटलं आहे.

आर्यनच्या बाजूनं मुकुल रोहतगी यांनी तब्बल दोन तास युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक माहिती देतानाच आर्यन खान कसा निर्दोष आहे हे न्यायालयासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. क्रुझवर जाण्यापूर्वीच आर्यन खानला अटक करण्यात आली. अटक करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नव्हती, असं रोहतगी यांनी न्यायलयाला सांगितलं.

रोहतगी म्हणाले की, माझा साक्षीदार क्रमांक १ आणि २ म्हणजेच प्रभाकर सैल आणि केपी गोसावी यांच्याशी माझा काहीही संबंध नाही आणि मी त्यांना ओळखत नाही. रोहतगी म्हणाले की, ही तरुण मुले आहेत. त्यांना सुधारगृहात पाठवले जाऊ शकते. त्यांच्यावर कारवाई होऊ नये.

मंगळवारी रोहतगी म्हणाले की, आर्यन खानला चुकीच्या पद्धतीनं अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं ड्रग्स मिळून आलेलं नाही. त्यांच्याविरोधात आरोप हा आहे की, आरोपी अरबाज मर्चंट सोबत क्रुझवर आला होता आणि त्याच्यावर ड्रग्स ठेवल्याचा आरोप आहे. 

आर्यन विरोधात कट रचला जातोय. आर्यन अरबाजसोबत आला. आर्यनला अरबाजकडे असलेल्या गोष्टींची माहिती असल्याचा दावा केला जातोय. कुणाच्यातरी बुटामध्ये काय आहे, त्याच्याशी आर्यनचा काही संबंध नाही, असा दावा रोहतगी यांनी केला आहे.



हेही वाचा

आम्हाला जाळून टाकू, मारून टाकू अशा धमक्या येत आहेत : क्रांती रेडकर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा