मुलाकडून आईच्या प्रियकराची हत्या

काही दिवसांपासून त्याला त्याच्या ५५ वर्षीय आईचे बाहेर अनैतिक संबध असल्याचा संशय होता. दरम्यान सोमवारी शाहबाजला त्याची आई बीकेसीतील एका निर्जनस्थळी परपुरूषासोबत दिसली. त्यावेळी चिडलेल्या शाहबाजने तिथेच आई आणि परवेझ याच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

SHARE

आईला एका परपुरूषासोबत निर्जनस्थळी पाहिल्याने राग अनावर झालेल्या मुलाने आईच्या प्रियकराची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना बीकेसीत उघडकीस आली. परवेझ शेख असं या मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी बीकेसी पोलिसांनी शाहबाज शेख या महाविद्यालयीन तरुणाला अटक केली आहे.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात शाहबाज त्याच्या आईसोबत राहतो.  शाहबाज हा महाविद्यालयात शिक्षण घेत असून त्याची आई खासगी ठिकाणी कामाला जायची. काही दिवसांपासून त्याला त्याच्या ५५ वर्षीय आईचे  अनैतिक संबध असल्याचा संशय होता. सोमवारी शाहबाजला त्याची आई बीकेसीतील एका निर्जनस्थळी परपुरूषासोबत दिसली. त्यावेळी चिडलेल्या शाहबाजने तिथेच आई आणि परवेझ याच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

शाब्दिक वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. त्यावेळी राग अनावर झालेल्या शाहबाजने दगडाने ठेचून परवेझची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच, बीकेसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परवेझचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाला पाठवून शाहबाजला अटक केली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा -

चेंबूर दंगलीप्रकरणी ३३ अटकेत, २०० जणांवर गुन्हा
संबंधित विषय
ताज्या बातम्या