मुलानंच दिली आईच्या खुनाची सुपारी

Shimpoli
मुलानंच दिली आईच्या खुनाची सुपारी
मुलानंच दिली आईच्या खुनाची सुपारी
मुलानंच दिली आईच्या खुनाची सुपारी
See all
मुंबई  -  

आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईच्या बोरीवलीच्या शिंपोली गावात घडली. मुलानेच आईच्या खुनाची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस झाली. रविवारी शिंपोलीयेथील धर्मामाली सोसायटीमध्ये एका 19 वर्षीय मुलाने एका महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. मात्र या महिलेवर जीवघेणा हल्ला तिच्या पोटच्या मुलाच्या सांगण्यावरून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी मुलगा धैर्य आणि आरोपी जबरार नाडार या दोघांना 302,452,120(बी) कलमांतर्गत पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी 16 एप्रिलला रात्री 10 च्या सुमारास धैर्य याचे त्याच्या आईसोबत पैशाच्या वादातून भांडण झाले. याचाच राग मनात धरून धैर्य घरातून बाहेर गेला आणि जेव्हा पुन्हा घरी आला तेव्हा त्याने घरात जाताना सोबत आलेला मित्र जबरार नाडार याच्या हातात चाकू देत आईवर वार कर असं सांगून स्वत: आपल्या खोलीत गेला. नाडार त्याच्या आईवर जेव्हा वार करत होता तेव्हा हा नराधम मुलगा घरात होता मात्र त्याला जराही दया आली नाही. अखेर महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान महिलेची प्रकृती गंभीर असून, पोलिसांनी या दोन्ही आरोपींना 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.