मारहाणीत एकाचा मृत्यू

 Goregaon
मारहाणीत एकाचा मृत्यू

गोरेगाव - आंबेडकरनगर परिसरातल्या जयअंबे झोपडपट्टीत राहणाऱ्या सुरेश हलजनचा मारहाणीत मृत्यू झाला. शुल्लक कारणावरून सुरेशचं त्याच्याच परिसरात राहणाऱ्या काका या व्यक्तीशी भांडण झालं. दोघंही दारूच्या नशेत होती त्यामुळे भांडणाचं रूपांतर मारामारीत झालं. या वेळी काकानं सुरेशला बेदम मारहाण केली. परिसरातल्या रहिवाशांनी भांडण सोडवत जखमी सुरेशला ट्रॉमा केयर रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला घरी सोडलं. मात्र सुरेशला पुन्हा त्रास होत असल्यानं त्याला सिद्धार्थ रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. काका हा सध्या फरार असून त्याचा तपास सुरूये. "याप्रकरणात शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कारवाई करू," असं वनराई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी चंद्रकांत गुरव यांनी स्पष्ट केलं. 

Loading Comments