अरेच्चा...महिलेसोबत तीचा बाळ असताना गाडी केली टो, क्लिप व्हायरल


अरेच्चा...महिलेसोबत तीचा बाळ असताना गाडी केली टो, क्लिप व्हायरल
SHARES

महिला ही तिच्या बाळासोबत गाडीत बसलेली असताना गाडी टो केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा प्रकार बघून सोशल मीडिआवर मुंबई पोलिसांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी मुंबई वाहतूक विभागासह पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.


काय होता प्रकार?

शुक्रवारी 10 नोव्हेंबरला संध्याकाळी मालाडच्या एसव्ही रोडवर एक एस. एक्स. फोर गाडी उभी होती. त्यावेळी गाडीला टो करण्यासाठी पोलिसांची टोईंग व्हॅन देखील बोलावण्यात आली. दरम्यान व्हॅन आल्यानंतर जे काही घडलं ते सगळे मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून फेसबुक लाईव्ह करण्यात आले.

ट्रॅफिक पोलिसांनी सदरची गाडी टो करण्यापूर्वी गाडीचा मालक आला. त्याच्यासोबत एक महिला आणि तीचं बाळ असल्याचं समजतं. त्यांनतर या व्यक्तीने पोलिसांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतूक पोलीस कोणत्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. एव्हाना गाडीत महिला ही तिच्या तान्ह्या बाळाला घेऊन बसली होती. ज्या व्यक्तीची ती गाडी होती त्याने वाहतून हवालदाराला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तब्बल २० मिनिटे हे न्याट्य सुरू होते. पण कोणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

शेवटी महिला तिच्या सात महिन्यांचं बाळ गाडीतच असताना पोलिसाने गाडी टो करण्यास सुरुवात केले. महिला गाडीत आपल्या बाळाला दूध पाजत असताना तिची गाडी टो केली जात असतानाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.


काय आहे या व्हिडिओत?

राखी नावाच्या महिलेच्या आयडीवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून त्यात दिसणारी महिला ही जिवाच्या आकांताने ओरडताना दिसून येते. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण डॉक्टरकडे गेलो असून व्हिडिओमध्ये तिने डॉक्टरची पावती देखील दाखवली.
दरम्यान या प्रकरणी वाहतूक शाखेचे डीसीपी (पश्चिम उपनगरे) यांना घटनास्थळी जाऊन चौकशी करण्याचे आदेश मुंबईसह पोलीस आयुक्त वाहतूक विभाग अमितेश कुमार यांनी दिले आहेत. एका दिवसात याचा रिपोर्टसह पोलीस आयुक्तांनी मागवला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा