बहिणीवर चाकू हल्ला

दहिसर - दहिसर पश्चिमेतील नवागावमध्ये राहणाऱ्या अनिल आणि गौरव राजभर या दोन भावांनी सख्या बहिणीवरच चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. घरगुती वादातून या दोन्ही भावांनी बहिणीच्या गळ्यावर चाकूने वार केला आणि स्वत:ला पोलिसांच्या हवाली केलं. कांदीवलीच्या शताब्दी रुग्णालयात बहिण मृत्यूशी लढतेय. अनिल आणि गौरव राजभर परिवारासोबत दहिसरच्या नायगाव परिसरात राहतात. त्यांची बहिण काही दिवसांपूर्वीच गावावरून मुंबईला आली होती. दरम्यान पोलीस दोन्ही आरोपींकडे चौकशी करून या हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून करण्यात आला याचा शोध पोलीस घेतायेत.

Loading Comments