SHARE

अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या वांद्रेतल्या घरात चोरी केल्याप्रकरणी खार पोलिसांनी एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तिच्याच घरी काम करणा-या अफसा नावाच्या महिलेवर सव्वा तीन लाखांची चोरी केल्याचा आरोप आहे. अर्पिता आणि तिचा नवरा आयुष शर्मा हे दोन दिवसासाठी बाहेर गले होते. रविवारी ते परतले असता त्यांना घरातील जवळपास सव्वा लाखांची रोकड आणि 10 ग्रॅमचे सोन्याचे नाणे आणि डिजायनर कपडे चोरीला गेल्याचं लक्षात आलं. त्यायानंतर त्प्रयांनी खार पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी घरातल्या नोकरांची चौकशी केली. संशय म्हणून पोलिसांनी अफसाला ताब्यात घेतलं. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या